UAE Hosts T20 Asia Cup
esakal
आशिया चषक २०२५ स्पर्धेला यूएईत आजपासून सुरुवात झाली असून अफगाणिस्तान-हाँगकाँग सलामीचा सामना खेळणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात असून १४ सप्टेंबरला दुबईत महामुकाबला रंगणार आहे.
पुढच्या वर्षीच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी तयारी म्हणून या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Asia Cup 2025 Prize Money And Awards: How Much The Winner Earn? : आशिया चषक २०२५ स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे आणि अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग असा सलामीचा सामना रंगणार आहे. संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या या स्पर्धेत ८ संघांनी सहभाग घेतला आहे. भारत, पाकिस्तान हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात आहे आणि १४ सप्टेंबरला महामुकाबला दुबईत होणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे. त्यामुळे आशियाई किंग कोण, यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. पण, या स्पर्धेतील विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळणार आहे, हे माहित्येय?