Sri Lanka entered the Asia Cup 2025 Super 4
esakal
Asia Cup 2025 Super 4 Scenario Explained: आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मधील तिसरा संघ निश्चित झाला. अ गटातून भारत व पाकिस्तान यांनी जागा पक्की केली असताना गुरुवारी श्रीलंकेनेही सुपर ४ मध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने ३ बाद १०१ धाव करताच सुपर ४ मधील जागा पक्की केली. पण, त्याचवेळी त्यांनी अफगाणिस्तानची धाकधुक वाढवली आणि बांगलादेशला आशेचे किरण दाखवले.