Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

Team India Asia Cup 2025 Super 4 Schedule : आशिया चषक २०२५ स्पर्धेतील गटसाखळी सामने संपल्यानंतर आता सर्वांची नजर सुपर ४ फेरीकडे लागली आहे. भारतीय संघाने गटसाखळीत दमदार कामगिरी करत सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे.
Asia Cup 2025 Super 4 schedule

Asia Cup 2025 Super 4 schedule

esakal

Updated on

Asia Cup 2025 Super 4 full schedule with India matches : आशिया चषक स्पर्धेतील सर्वात मोठा अपसेट गुरुवारी झाला. अफगाणिस्ता जो आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा तगडा संघ मानला जातो, त्यांना श्रीलंकेने बाहेरचा रस्ता दाखवला. अफगाणिस्तानने विजयासाठी ठेवलेले १७० धावांचे लक्ष्य श्रीलंकेने १८.४ षटकांत ६ विकेट्स राखून सहज पार केले. कुशल मेंडिसने नाबाद ७४ धावांची खेळी करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या पराभवामुळे अफगाणिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपले आणि बांगलादेश सुपर ४ मध्ये पोहोचला. यासह सुपर ४ मधील चारही संघ निश्चित झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com