ASIA CUP 2025 SUPER FOUR SCENARIO
esakal
बांगलादेशने अफगाणिस्तानवर ८ धावांनी विजय मिळवत सुपर ४ मधील संधी कायम ठेवली आहे.
ब गटात श्रीलंका २ विजयांसह अव्वल स्थानी असून बांगलादेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अफगाणिस्तान व श्रीलंका यांच्यातील शेवटचा सामना गटातील समीकरण ठरवणार आहे.
Asia Cup 2025 Super Four qualification scenario explained : आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोरची चुरस आणखी वाढली आहे. मंगळवारी झालेल्या लढतीत बांगलादेशने बलाढ्य अफगाणिस्तानला पराभूत करून सुपर ४ मधील आशा कायम राखल्या आहेत. पण, बांगलादेशच्या या विजयाने ब गटातील स्पर्धा रोमांचक वळणावर आली आहे. आतापर्यंत भारत हा एकमेव संघ सुपर ४ मध्ये पोहोचला आहे आणि उर्वरित तीन जागांसाठी पाच संघांना अजूनही संधी आहे.