India will once again face Pakistan in the Asia Cup 2025
esakal
भारताने सुपर ४ मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला.
अभिषेक शर्मा (७४) आणि शुभमन गिल (४७) यांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली.
पाकिस्तानच्या खेळाडूंनी डिवचण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय फलंदाजांनी फलंदाजीने उत्तर दिले.
India vs Pakistan Asia Cup 2025 final date and time : भारताकडून दोन वेळा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानच संघ तिसऱ्यांदा वस्त्रहरण करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताने अ गटातील दुसऱ्या लढतीत आणि सुपर ४ मधील लढतीत शेजाऱ्यांवर दणदणीत विजयाची नोंद केली. साखळी गटातील लढतीत भारताने ७ विकेट्स राखून पराभूत केले आणि तो सामना हस्तांदोलन प्रकरणामुळे गाजला. काल सुपर ४ च्या लढतीत पाकिस्तानचा धुव्वा उडवून भारताने फायनलच्या दिशेने कूच केली आहे.