Suryakumar Yadav avoided shaking hands with Pakistan captain Salman Agha
esakal
आशिया चषक २०२५च्या पत्रकार परिषदेत भारत-पाकिस्तान सामन्याची सर्वाधिक चर्चा झाली.
सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आघा यांच्यात हस्तांदोलन झाले नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येणार असल्याने उत्सुकता वाढली आहे.
Did Suryakumar Yadav avoid handshake with Salman Agha? आजपासून सुरू होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेत सहभागी सर्व ८ संघांच्या कर्णधारांची एकत्रित पत्रकार परिषद आज पार पडली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यातील चर्चा यावेळी रंगली. सूर्यकुमार यादव व पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांच्या मध्ये अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान बसलेला दिसला.