
Mohsin Naqvi Claims Humiliation, Mentions SKY by Name : भारत-पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक २०२५ स्पर्धेतील वाद मिटण्याचं नाव घेत नाही. आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी ठाम भूमिका घेताना आशियाई क्रिकेट परिषद ( ACC) व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB ) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याहस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वी ट्रॉफी व मेडल घेऊन पसार झाले. या घटनेचे पडसाद ACC च्या बैठकीत उमटले. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नक्वी यांना कठोर शब्दात जाब विचारला, परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यांनी ट्रॉफी हवी असेल तर सूर्यकुमार यादवने स्वतः येऊन ती घेऊन जावी, असेही म्हटले.