SHAHID AFRIDI TELLS MOHSIN NAQVI TO CHOOSE BETWEEN PCB AND MINISTRY
esakal
Shahid Afridi criticises Mohsin Naqvi over dual roles : एक तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद सांभाळा किंवा पाकिस्तान सरकारचे मंत्रीपद यापैकी एकच जबाबदारी सांभाळा, असा सल्ला मोहसिन नक्वी यांना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने दिला आहे. पाकिस्तान संघाला आशिया चषक स्पर्धेत भारताकडून ३-० असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यात त्यांचा संपूर्ण स्पर्धेत झालेला अपमान तो वेगळा... त्यामुळे नक्वी यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असेही आफ्रीदी म्हणाला. पाकिस्तान क्रिकेटला विशेष लक्ष आणि वेळ देण्याची गरज आहे, असेही तो म्हणाला.