Asia Cup 2025 trophy controversy Mohsin Naqvi statement
esakal
Asia Cup 2025 trophy controversy Mohsin Naqvi statement: आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाकडून तीनवेळा वस्त्रहरण झाल्यानंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा ( PCB) माजोरडेपणा काही केला कमी होताना दिसत नाही. भारत-पाकस्तान यांच्यातले संबंध पहलगाम हल्ल्यानंतर आणखी बिघडले आणि त्यानंतर आशिया चषक २०२५ स्पर्धेत उभय संघ प्रथमच क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर आले.
त्यामुळे वाद होणे अपेक्षित होते आणि ते घडलेही. भारताने शेजाऱ्यांची पुरती जिरवून आशिया चषक जिंकला आणि त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे ( ACC) प्रमुख मोहसिन नक्वी नाट्यमय घडामोडीनंतर चषक घेऊन पळून गेले. भारताला अजूनही आशिया चषक मिळालेला नाही आणि आता मोहसिन नक्वीने नवा फतवा काढला आहे.