Vaibhav Suryavanshi batting at number three for India
esakal
India best batting lineup for Asian Games 2026: जपानविरुद्धची एकमेव ट्वेंटी-२० लढत जिंकल्यानंतर भारतीय संघ आता आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी सज्ज झाला आहे. जपानविरुद्धचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे ५-५ षटकांचा खेळवण्यात आला आणि त्यात श्रेयस अय्यरच्या संघाला फक्त २ धावांनी विजय मिळवता आला. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा मान टाकली आणि त्यामुळेच आशियाई स्पर्धेत टीम इंडियाच्या बॅटिंग लाईनअपबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ ( Mohammad Kaif) याने प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसन, अभिषेक शर्मा यांच्यासह वैभव सूर्यवंशीलाही ( Vaibhav Sooryavanshi) स्थान द्यावे असा सल्ला दिला आहे.