

Tema India
Sakal
आयपीएल २०२६ स्पर्धा संपल्यानंतर आता अवघ्या ६ दिवसात भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्या हंगामाची सुरुवात करणार आहे. भारतीय संघाला मुल्लनपूरमध्ये ६ ते १० जून दरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळायचा आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा झाली आहे. पण या संघात रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या जम्मू-काश्मीरचा गोलंदाज आकिब नबीला संधी न मिळाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. पण आता त्याला या कसोटीच्या तयारीसाठी भारतीय संघाकडून बोलावणं आलं असल्याचे समोर आले आहे.