

Test Cricket
Sakal
ICC Test cricket marathi news: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) कार्यकारी मंडळाची दोन दिवसांची बैठक अहमदाबाद येथे नुकतीच झाली. आयसीसीच्या काही बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यात गुलाबी चेंडूचा वापर आणि शीतपेयाच्या ब्रेकमध्ये मुख्य प्रशिक्षक मैदानात येऊन मार्गदर्शन करणे अशा गोष्टींचा समावेश आहे.
तसेच या बैठकीदरम्यान भ्रष्टाचारप्रकरणी कॅनडा क्रिकेट संघटनेला निलंबित करण्यात आले. तसेच बांगलादेश क्रिकेट संघटनेच्या निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी आयसीसीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.