Abhishek Sharma and Harshit Rana during their crucial partnership against Australia in the 2nd T20I match.
esakal
India vs Australia 2nd T20I Marathi Cricket Update: भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले असताना सलामीवीर अभिषेक शर्माने ( Abhishek Sharma) एकहाती खिंड लढवली. जॉश हेझलवूडने त्याच्या स्पेलमध्ये तीन धक्के देताना भारताची अवस्था ५ बाद ४९ धावा अशी दयनीय केली होती. पण, याही परिस्थितीत अभिषेक खंबीरपणे मैदानावर उभा राहिला आणि त्याच्या जोडीला हर्षित राणाने ( Harshit Rana) अप्रतिम फलंदाजी केली. अभिषेक-हर्षित यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. हर्षितने त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवताना फलंदाजीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले.