Abhishek Sharma’s explosive fifty
esakal
Cricket
IND vs AUS 2nd T20I Live: परिस्थिती गंभीर, Abhishek Sharma खंबीर! निम्मा संघ माघारी परतला, पण गडी नाही खचला; २१७ च्या स्ट्राईक रेटने ठोकली फिफ्टी
Australia vs India 2nd T20I Marathi Cricket :  भारताचा डाव अक्षरशः गडगडत असताना अभिषेक शर्मा मैदानावर उभा राहिला! एकीकडे जोश हेजलवूड आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची धांदल उडवली, तर दुसरीकडे अभिषेकने जबरदस्त प्रतिकार करत फटकेबाजी सुरू ठेवली. 
India vs Australia 2nd T20I Marathi Cricket Update: भारतीय संघाला एकामागून एक धक्के देऊन जॉश हेझलवूडने ( josh Hazlewood) ने मेलबर्नचा सामना गाजवला. कर्णधार मिचेल मार्शने हेझलवूडकडून चार षटकं एकाच स्पेलमध्ये टाकून घेतली आणि त्यानेही १२ धावा देत ३ धक्के देऊन टीम इंडियाची अवस्था ५ बाद ४९ अशी दयनीय केली. असे असताना अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma Fifty) दुसऱ्या बाजूने त्याच्या शैलीत फटकेबाजी करून अर्धशतक झळकावले.
