SHUBMAN GILL’S STEADY KNOCK AS INDIA POST RESPECTABLE TOTAL
esakal
India vs Australia 4th T20I Marathi Update : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सूर्यकुमार यादवच्या संघाने सन्मानजनक धावसंख्या उभी केली. शुभमन गिल ( Shubman Gill) आणि सूर्यकुमार यांची मालिकेतील कामगिरी काही खास झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर आज दडपण होते. टीकाकारांना उत्तर देण्यासाठी शुभमन मैदानावर उतरला, परंतु त्याची खेळी संथ राहिली. सूर्या आजही अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियान गोलंदाजांनी चांगला फास आवळून भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.