दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या वन डे सामन्यात ८४ धावांनी पराभूत करून मालिका २-० ने जिंकली.
ऑस्ट्रेलियाचा संघ सलग चौथ्या वन डे सामन्यात ऑल आऊट झाला.
मॅथ्यू ब्रित्झकेने ७८ चेंडूंत ८८ धावा करून नवज्योत सिद्धूनंतर सलग ४ डावांत ५०+ करणारा दुसरा खेळाडू ठरला.
SOUTH AFRICA BEAT AUSTRALIA IN AN ODI SERIES IN AUSTRALIA: ऑस्ट्रेलियाचा संघ सलग चौथ्या वन डे सामन्यात ऑल आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १९३ धावांवर परतला. आफ्रिकेने ८४ धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. लुंगी एनगिडी ( Lungi Ngidi), मॅथ्यू ब्रित्झके व त्रिस्तान स्तब्स या विजयात चमकले. आफ्रिकेने या विजयासह पाकिस्तानचा मोठा विक्रम मोडला.