Dewald Brevis breaks Virat Kohli and Babar Azam T20I records : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिसने वादळी फटकेबाजी केली. त्याने १ चौकार व ६ षटकारांसह २६ चेंडूंत ५३ धावा करताना संघाला ७ बाद १७२ धावांपर्यंत पोहोचवले. रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन ( नाबाद ३८), त्रिस्तान स्तब्स ( २५) व ड्रे प्रेटोरियस ( २४) यांनी चांगली साथ दिली. ब्रेव्हिसने या फटकेबाजीसह भारताचा महान फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांच्यासह ७ मोठे विक्रम मोडले.