डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या T20 सामन्यात २६ चेंडूत ५३ धावांची वादळी खेळी केली.
त्याने एक चौकार आणि सहा षटकार लगावले, त्यापैकी तीन षटकार "नो-लूक" पद्धतीने होते.
ब्रेव्हिसने आरोन हार्डीच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार ठोकले.
Brevis no-look sixes video viral against Australia T20 match: डेवॉल्ड ब्रेव्हिसनं मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रण जणू केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत शतकानंतर त्याने आता तिसऱ्या सामन्यात वादळी अर्धशतक झळकावले. त्याने सलग चार षटकार खेचले अन् त्यापैकी तीन चेंडू तर न पाहता भिरकावले. त्याने टोलावलेला प्रत्येक षटकार एवढा उत्तुंग होता की काही चेंडू स्टेडियमच्या छतावर जाऊन पडले, तर एक चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात प्रेक्षकांमधील एक व्यक्ती स्टेडियमबाहेरील जाळीवर जाऊन धडकला.