भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने सात वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करम याच्यासाठी एक ट्विट केलं होतं. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये मार्करमने शतक झळकावल्यानंतर विराटचं ते ट्विट पुन्हा व्हायरल होत आहे. मार्करमच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका WTC Final मध्ये विजयाच्या जवळ पोहोचली आहे. मार्करमला कर्णधार टेम्बा बवुमाची चांगली साथ मिळाल्याने ऑस्ट्रेलिया पराभवाच्या छायेत गेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा मार्करम हा दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.