Aus vs Nz : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी विजयात नॅथन लायन चमकला ; न्यूझीलंडचा १७२ धावांनी धुव्वा

पाहुण्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने रविवारी न्यूझीलंड संघाचा १७२ धावांनी धुव्वा उडवत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याचसोबत न्यूझीलंडविरुद्धच्या सलग १२व्या मालिकांमध्ये जेतेपद आपल्याकडे राखण्याची किमयाही साधली.
Aus vs Nz
Aus vs Nzsakal

वेलिंग्टन : पाहुण्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने रविवारी न्यूझीलंड संघाचा १७२ धावांनी धुव्वा उडवत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याचसोबत न्यूझीलंडविरुद्धच्या सलग १२व्या मालिकांमध्ये जेतेपद आपल्याकडे राखण्याची किमयाही साधली. पहिल्या डावात नाबाद १७४ धावांची खेळी साकारणारा कॅमेरुन ग्रीन सामन्याचा मानकरी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे न्यूझीलंडची आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या ३६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने तीन बाद १११ या धावसंख्येवरून सकाळच्या सत्रात पुढे खेळायला सुरुवात केली; पण त्यांना १९६ धावांपर्यंतच मजल मारता आली. राचिन रवींद्रने ५९ धावांची, डॅरेल मिचेलने ३८ धावांची खेळी केली. नॅथन लायन याने ६५ धावा देत न्यूझीलंडच्या सहा फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. नॅथन लायन याने या कसोटीत दहा फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया - पहिला डाव ३८३ धावा. न्यूझीलंड - पहिला डाव १७९ धावा. ऑस्ट्रेलिया - दुसरा डाव १६४ धावा. न्यूझीलंड - दुसरा डाव १९६ धावा.

Aus vs Nz
Ranji Trophy : विदर्भ अजूनही ६९ धावांनी पिछाडीवर ; मंत्रीच्या शतकामुळे मध्य प्रदेशला आघाडी

दृष्टिक्षेपात

  • ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सलग सहा कसोटी सामन्यांत विजय संपादन केले.

  • ऑस्ट्रेलियाने सलग बाराव्यांदा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचे अजिंक्यपद आपल्याकडे कायम राखण्याची किमया साधली. न्यूझीलंडने १९९२-९३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेचे जेतेपद आपल्याकडे राखले होते. त्यानंतर मात्र त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.

  • नॅथन लायन याने दुसऱ्या डावात न्यूझीलंडचे ६५ धावांत सहा फलंदाज बाद केले. याचसोबत नऊ कसोटी खेळणाऱ्या देशांविरुद्ध त्यांच्याच देशात एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा लायन हा तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी शेन वॉर्न व मुथय्या मुरलीधरन यांनी हा करिष्मा करून दाखवला आहे.

  • नॅथन लायन याने कसोटीच्या चौथ्या डावात ११९ फलंदाज बाद केले आहेत. चौथ्या डावात सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शेन वॉर्न १३८ विकेटसह पहिल्या स्थानावर आहे.

  • नाणेफेक जिंकल्यानंतर मायदेशात कसोटी गमावण्याची न्यूझीलंडची २०१०नंतरची ही दुसरीच खेप ठरली. याआधी गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com