तब्बल ९ World Cup ट्रॉफी अन् T20I मध्ये १६ प्लेअर ऑफ द मॅच... स्टार अष्टपैलूने इतिहास घडवत रचना नवा विश्वविक्रम

Ellyse Perry Historic 9th World Cup Title: ऑस्ट्रेलियाने महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा रविवारी जिंकली. हे विजेतेपद ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूसाठी एकून ९ वे जगज्जेतेपद होते.
Women's T20I World Cup 2026

Australia Women Cricket Team

Sakal

Updated on

Women's T20 World Cup 2026: रविवारी (५ जुलै) क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने इंग्लंड महिला संघाला ७ विकेट्सने पराभूत केले आणि सातव्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले. ऑस्ट्रेलियाचे या स्पर्धेत एकतर्फी वर्चस्व राहिले आहे. यापूर्वी कोणत्याच संघाने दोनपेक्षा अधिक महिला टी२० वर्ल्ड कप जिंकलेला नाही.

Women's T20I World Cup 2026
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा विजेते! आजवर कधी अन् कोणत्या देशाने जिंकली ट्रॉफी? जगज्जेत्या कर्णधारांचीही पाहा यादी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com