

Australia Move Top Of Group 1 To Heat Up Semifinal Race | T20 Women World Cup
Sakal
Women's T20 WC, AUS W vs NED W: इंग्लंडमध्ये महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत शनिवारी ऑस्ट्रेलिया महिला संघाने दणदणीत विजयासह भारतीय संघाचे टेन्शन वाढवले आहे. शनिवारी ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्स महिला संघाला ९८ धावांनी पराभूत केले.
ऑस्ट्रेलियाचा हा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय होता. त्यामुळे त्यांनी ६ गुण मिळवले आहेत. याशिवाय त्यांचा नेट रन रेटही ४.३९१ असा दमदार आहे. त्यामुळे ए गटात ऑस्ट्रेलियाने भारताला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे.