

IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना ऍडलेडला ऍडलेड ओव्हल स्टेडियमवर होणार आहे.
हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ तयारीला लागले आहेत. दोन्ही संघांचा या सामन्यासाठी सराव सुरू आहे. तथापि, या सरावादरम्यान ऑस्ट्रेलियावरील तणाव वाढला होता.