

Hasan Mahmud 6 Wickets
Sakal
AUS vs BAN DARWIN TEST MARATHI NEWS: बांगलादेशचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीला डार्विनमध्ये गुरुवारी (१३ ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. यासह ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२६ मधील पुढच्या टप्प्यालाही सुरुवात झाली.
मात्र पहिल्याच कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ ढेपाळला. बांगलादेशचा २६ वर्षीय वेगवान गोलंदाज हसन मेहमुद (Hasan Mahmud) याने अफलातून गोलंदाजी करताना ६ विकेट्स घेतल्या.