

Australia vs India 5th
Sakal
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या टी२० मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी (८ नोव्हेंबर) खेळवला जात आहे. हा सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा येथे खेळवला जात आहे. भारतीय संघाने काही वर्षांपूर्वी गॅबामध्येच अविस्मरणीय कसोटी विजय मिळवला होता, आता तिथेच भारतीय संघ टी२० सामना खेळायला उतरला आहे.
तसेच भारताला पुन्हा एकदा गॅबावर विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी आहे. या मालिकेत चुरशीचे सामने पाहायला मिळाले आहेत आता अखेरचा सामनाही रोमांचक होईल, अशी अपेक्षा अनेक चाहत्यांची आहे.