Video : मैदानात नेमकं घडलं तरी काय? एकदा-दोनदा नाही तर 12व्यांदा डोक्याला लागला बॉल, फलंदाज गंभीर जखमी

Will Pucovski Injured News : ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज विल पुकोवस्की पुन्हा एकदा अपघाताचा बळी ठरला आहे.
Will Pucovski Injured Marathi News
Will Pucovski Injured Marathi News

Will Pucovski Video : ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज विल पुकोवस्की पुन्हा एकदा अपघाताचा बळी ठरला आहे. सामन्यादरम्यान डोक्याला चेंडू लागल्याने तो मैदानात पडला. आश्चर्यकारक बाब म्हणजे हा प्रकार त्याच्यासोबत एकदा-दोनदा नाही तर 12व्यांदा घडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो अशा अपघाताचा बळी ठरला.

Will Pucovski Injured Marathi News
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीमध्ये 'लॉर्ड' शार्दूलचे वादळ! षटकार मारत ठोकले पहिले शतक, अश्विनचे ट्वीट व्हायरल

शेफील्ड शील्डमध्ये क्रिकेट व्हिक्टोरियाकडून खेळणारा पुकोवस्की रविवारी एका भीषण अपघाताचा बळी ठरला. तस्मानियाच्या रिले मेरेडिथचा बाउन्सर चेंडू त्याच्या डोक्याला लागला, त्यानंतर तो मैदानावर पडला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुकोवस्की बाऊन्सर सोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो पूर्णपणे खाली बसण्यापूर्वीच चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला, त्यानंतर लगेचच तो मैदानावर पडला. या अपघातानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला. आतापर्यंत त्याची कोणतेही अपडेट आलेले नाही. मात्र, या घटनेमुळे त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Will Pucovski Injured Marathi News
Ranji Trophy : क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! रणजी क्रिकेटपटू रोहित शर्माचे निधन

क्रिकेट व्हिक्टोरियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुकोवस्की सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. आम्ही योग्य वेळी त्यांच्या स्थितीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करू. या वर्षी जानेवारी महिन्यातही तो अशाच अपघाताचा बळी ठरला होता. यातून सावरल्यानंतर त्याने फेब्रुवारीमध्ये न्यू साउथ वेल्सविरुद्ध 131 धावा केल्या होत्या. पण तो उर्वरित सामन्यांचा भाग असेल की नाही याबद्दल अद्याप कोणतेही अपडेट नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com