

Australia Women Cricket Team
Sakal
Australia Women Squad for India Series: भारतीय महिला क्रिकेट संघ फेबुवारी-मार्च दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांत वनडे, कसोटी आणि टी२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे.
यावेळी ऑस्ट्रेलियाने नव्या कर्णधाराचीही घोषणा केली आहे. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाची सध्याची कर्णधार एलिसा हेली (Alyssa Healy) क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. त्यामुळे तिच्या जागेवर सोफी मोलिनेक्स (Sophie Molineux) हिच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.