
Australia vs India Women: रविवारी भारतीय पुरुष संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच ऍडलेडमध्ये १० विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर लगेचच काही वेळात भारतीय महिला संघही ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात १२२ धावांनी पराभूत झाला.
यामुळे ऑस्ट्रेलिया महिला संघाने तीन सामन्यांची वनडे मालिकाही २-० अशा विजयी आघाडीसह खिशात टाकली आहे.
महिला वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ४४.५ षटकात २४९ धावांवर सर्वबाद झाला.