

Ruturaj Gaikwad - Ayush Mhatre
Sakal
Chennai Super Kings Marathi News: चेन्नई सुपर किंग्सला (CSK) सध्या खेळाडूंच्या दुखापतीची चिंता सतावत आहे. IPL 2026 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच आधीच वेगवान गोलंदाज नॅथन एलिस दुखापतीमुळे हंगामातून बाहेर झाला. तसेच एमएस धोनीही पोटरीच्या दुखापतीतून सावरत आहे.
यातच स्पर्धा सुरू झाल्यानंतर पाच सामन्यांनंतर वेगवान गोलंदाज खलील अहमदला मांडीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. यानंतर आता १८ वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रेलाही (Ayush Mhatre) स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे.