

Ayush Mhatre Ruled out of IPL 2026
Sakal
Chennai Super Kings Marathi News: चेन्नई सुपर किंग्स संघाला गेल्या काही दिवसात मोठे धक्के बसले आहेत. चेन्नईसाठी आयपीएल २०२६ (IPL 2026) स्पर्धा संमिश्र ठरली आहे. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांतील ४ सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यातच आता चेन्नईला (CSK) खेळाडूंच्या दुखापतीचा जबरदस्त धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वीच खलील अहमद मांडीच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर झाला होता. एमएस धोनीही (MS Dhoni) पोटरीच्या दुखापतीतून सावरत असून तोही अद्याप या हंगामात खेळलेला नाही. त्यातच आता १८ वर्षीय आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) देखील आयपीएल २०२६ मधून बाहेर झाला आहे. याबाबत चेन्नई सुपर किंग्सने माहिती दिली आहे.