Rishabh Pant failed to score on their return from injury
esakal
Ayush Mhatre fifty vs South Africa A 1st Test highlights: दुखापतीनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतला ( Rishabh Pant) दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध अपयश आले. इंग्लंड दौऱ्यावर असताना जखमी झालेला रिषभ भारत अ संघाकडून कर्णधार म्हणून मैदानावर उतरला. त्याने त्याच्या नेहमीच्या शैलीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले, परंतु तो फलंदाजीत अपयशी ठरला. आफ्रिकेच्या पहिल्या डावातील ३०९ धावांच्या प्रत्युत्तरात रिषभ फक्त १७ धावा करू शकला. देशांतर्गत क्रिकेट गाजवणारा रजत पाटीदारही अपयशी ठरला, पण १८ वर्षीय आयुष म्हात्रेने अर्धशतक झळकावून भारताची लाज वाचवली.