Babar Azam’s Clean Bowled Moment Creates Stir : आशिया चषक २०२५ स्पर्धेतील संघातून वगळल्यानंतर बाबर आझम याच्यात पुनरागमनाची जिद्द दिसेल असे वाटले होते, परंतु पाकिस्तानचा 'किंग' प्रदर्शनीय सामन्यात अपयशी ठरलेला पाहायला मिळाला. पेशावर झाल्मी संघाचे नेतृत्व करणारा बाबर लिजंट्स एकादश संघाविरुद्ध अपयशी ठरला. इंझमाम उल हकच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळला आणि १५ षटकांच्या या सामन्यात बाबरच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्याने चाहत्यांना निराश केले नाही आणि तो २३ चेंडूंत ४१ धावांवर बाद झाला. सईज अजमलच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला.