भारत-पाकिस्तान यांच्यातल्या तणावामुळे पाकिस्तान सुपर लीगही ( PSL) स्थगित केली गेली होती. पण, तणाव निवळला अन् शेजारी पुन्हा एकदा इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ( IPL) स्पर्धा करायला उतरले. आयपीएल २०२५ ला १७ मे पासून पुन्हा सुरुवात होते आणि PSL 2025 नेही हीच तारीख निवडली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) ही लीग यूएईत खेळवण्याचे जाहीर केले होते, परंतु बीसीसीआयशी पंगा नको, हा पवित्रा घेत यूएईने पाकिस्तानला नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर तोंडावर आपटण्याची नामुष्की ओढावली. आता पीएसएल पुन्हा सुरू होतेय, परंतु परदेशी खेळाडू पाकिस्तानात येण्याच्या मानसिकतेत नाहीत.