पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कारवाईचे सत्र सुरू ठेवले आहे. पाणी करार मोडल्यानंतर भारताने पाकिस्तानी विमानांना भारताच्या हवाई क्षेत्रात उड्डाण करण्यास बंदी घातली आहे आणि त्यामुळे त्यांचे दिवसाला लाखोंचे नुकसान होत आहे. त्यात आता भारताने डिजिटल आघाड्यावर पावले उचलली असून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना सोशल मीडियावर धक्का दिला आहे. भारत सरकारने बाबर आझम, मोहम्मद रिझवान, हॅरिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भारतात बंदी घातली आहे.