

Bangladesh Cricket Team
Sakal
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंका या दोन देशांकडे आहे. त्यामुळे ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतील सामने भारत आणि श्रीलंका येथील एकूण ८ मैदानांवर खेळवण्यात येणार आहेत.
या स्पर्धेला आता महिनाभराचा कालावधी राहिलेला असताना सहभागी देश आपापले संघ घोषित करत आहेत. एकिकडे या स्पर्धेत भारतात बांगलादेश संघ खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह कायम असतानाच दुसरीकडे या स्पर्धेसाठी बांगलादेशने (Bangladesh Squad) त्यांचा संघ जाहीर केला आहे.