
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणं हा कोणत्याही फलंदाजाच्या खेळीतील महत्त्वाचा टप्पा असतो. शतक केल्यानंतर त्या फलंदाजाला आणि त्याच्या संघाला आनंद होणे ही सहाजिकच गोष्ट आहे.
त्यामुळे शतक साजरं करताना अनेक फलंदाज अनोख्या गोष्टीही करत असतात. जसं की काही दिवसांपूर्वी आयपीएल २०२५ मध्ये रिषभ पंतने शतक केल्यानंतर कोलांटी उडी मारली होती. पण कधीकधी अनोख्या सेलीब्रेशन करण्याच्या नादात काहीतरी भलतंच होऊ शकतं. बांगलादेशचा कसोटी कर्णधार नजमुल हुसैन शान्तोच्या बाबतीतही असंच काहीसं झालं आहे.