
शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) श्रीलंका संघाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या वनडेत तब्बल १७४ धावांनी पराभवाचा धक्का दिला. कसोटीत मार खाल्यानंतर वनडेत मात्र श्रीलंकेने मायदेशात अफलातून कामगिरी केली आहे.
शुक्रवारी श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला वरचढ होण्याची कोणतीच संधी दिली नव्हती. पण या सामन्यात ऍडम झाम्पाने घेतलेला झेल मात्र चर्चेचा विषय ठरला. त्याच्या झेलावर निर्णय देणं थर्ड अंपायरलाही अवघड झालं होतं.