BAN vs CA XI : बांगलादेशचा संघ ५४ धावांत तंबूत! ऑस्ट्रेलियन Campbell Thompson ने घेतल्या ८ विकेट्स; कसोटी मॅच डावाने जिंकली

Bangladesh bowled out for 54 against Cricket Australia XI: बांगलादेशला ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच्या सराव सामन्यात मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला. क्रिकेट ऑस्ट्रेलिया XI विरुद्धच्या डार्विनमधील सामन्यात बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या ५४ धावांत आटोपला. त्यामुळे CA XI ने हा सामना तब्बल एक डाव आणि ३८ धावांनी जिंकला.
Cricket Australia XI beat Bangladesh by an innings and 38 runs

Cricket Australia XI beat Bangladesh by an innings and 38 runs

esakal

Updated on

Cricket Australia XI beat Bangladesh by an innings and 38 runs: बांगलादेशचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे आणि तेथे त्यांना सराव सामन्यात एक डाव व ३८ धावांनी हार पत्करावी लागली. बांगलादेश विरुद्ध क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश या सामन्यात गोलंदाज कॅम्बेल थॉम्पसन ( Campbell Thompson) चमकला. त्याने दुसऱ्या डावात ८ विकेट्स घेऊन बांगलादेशचा संपूर्ण संघ ५४ धावांत तंबूत पाठवला. त्याने पहिल्या डावात केवळ १ विकेट घेतली होती, परंतु दुसऱ्या डावात त्याच्या वेगासमोर बांगलादेशने शरणागती पत्करली. कॅम्बेलने ११-२-२५-८ अशी स्पेल संपवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com