

Bangladesh Won Test Series Against Pakistan 2026
Sakal
Bangladesh Whitewash Pakistan: बांगलादेश क्रिकेट संघाने बुधवारी इतिहास घडवला आहे. सिल्हेटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला ७८ धावांनी पराभूत केले आहे.
कसोटी मालिकेतील (Test Series) हा दुसरा सामना असल्याने बांगलादेशने पाकिस्तानल व्हाईटवॉश देण्याचाही इतिहास घडवला. पहिल्या सामन्यातही बांगलादेशने विजय मिळवला होता. घरच्या मैदानात पाकिस्तानला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश (Whitewash) देण्याची ही बांगलादेशची (Bangladesh Cricket Team) पहिली वेळ होती.