Bangladesh asks Pakistan to end India match boycott
esakal
Bangladesh Joins ICC Pressure Over India T20 World Cup Clash: बांगलादेश क्रिकेट संघाच्या मागण्या अमान्य करत आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने स्कॉटलंडचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत समावेश करून घेतला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खवळला आणि त्यांनी वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्काराची धमकी दिली. पण, त्यांची धमकी क्षणोक्षणी बदलली... वर्ल्ड कप खेळू पण भारताविरुद्ध मैदानावर उतरणार नसल्याचे नंतर पाकिस्तान सरकारने जाहीर केले. त्यात आता पीसीबीने हा निर्णय बदलण्यासाठी आयसीसीकडे तीन मागण्या केल्याचे वृत्त समोर आले. आता या सर्व घडामोडी सुरू असताना श्रीलंका क्रिकेट व इमिराती क्रिकेट बोर्ड यांनी पाकिस्तानला निर्णय बदलण्याची विनंती केली. ज्या बांगलादेशवरून पाकिस्तानने एवढे नाटक केले आता त्यांनीच पाकिस्तानला एक मेसेज पाठवला आहे.