

Bangladesh Cricket Team
Sakal
भारत आणि बांगलादेश या दोन देशांतील संबंध बिघडत चालले आहेत. बांगलादेशमध्ये हिंदू समुदायातील लोकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या सातत्याने येत असल्याने भारतभरात संताप व्यक्त होत आहे. याच कारणांनी अनेकांनी आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडूंना खेळवण्याला विरोध केला.
विरोध तीव्र असल्याने बीसीसीआयने (BCCI) कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) त्यांच्या संघातील बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला संघातून काढण्याचे निर्देश दिले. या प्रकरणामुळ भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंधही बिघडल्याचे दिसत आहेत. या दोन देशात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मालिकांवरही आता प्रश्नचिन्ह आहे.
मात्र आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आगामी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा (T20 World Cup 2026) खेळण्यासाठीही भारतात येणार नसल्याचे स्पष्ट केल आहे.