

BCCI Prize Money for U19 Team India
Sakal
BCCI announces reward for U19 World Cup Winner Team India: भारताच्या युवा संघाने शुक्रवारी (६ फेब्रुवारी) इतिहास रचला आहे. हरारेमध्ये भारताच्या १९ वर्षांखालील भारतीय संघाने इंग्लंडच्या युवा संघाला पराभूत वर्ल्ड कप ट्रॉफीवर ६ व्यांदा नाव कोरलं. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ या संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य होता.
अंतिम सामन्यातही भारतीय संघाने (Team India) १९ वर्षांखालील इंग्लंड संघाला तब्बल १०० धावांनी पराभवाचा धक्का दिला. या स्पर्धेत भारताचा वैभव सूर्यवंशी मालिकावीरही ठरला. यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) या युवा जगज्जेत्या भारतीय संघाला मोठ्या बक्षीसाची घोषणा (Prize Money) करण्यात आली आहे.