

Team India Coaching Staff
Sakal
आयपीएल २०२६ स्पर्धेनंतर आता भारतीय क्रिकेट संघाच्या (Team India) आंतरराष्ट्रीय हंगामाला सुरुवात होत आहे. भारतीय संघ आता आगामी १०-१२ महिने व्यस्तच राहणार आहे. याशिवाय २०२७ वनडे वर्ल्ड कपसाठीही भारतीय संघाची तयारी सुरू होणार आहे.
अशातच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) टीममध्ये आता आणखी एका सदस्याचा समावेश झाला आहे.