

India Test Team
Sakal
Team India Schedule: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेची (IPL 2026) रविवारी (३१ मे) सांगता झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपदाला गवसणी घातली. अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने गुजरात टायटन्सला ५ विकेट्सने पराभूत केले आणि दुसऱ्यांदा आयपीएल ट्ऱॉफीवर नाव कोरले.
तब्बल २ महिने चाललेल्या या स्पर्धेचा बंगळुरूने शेवट गोड केला. पण आता यानंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जोर धरणार आहे. भारतीय संघाचे पुढील १२ महिने चांगलेच व्यस्त असणार आहेत.