
भारतीय संघासाठी गेले ६ महिने चढ-उताराचे राहिले. त्यातही भारताला सर्वात मोठं यश मिळालं ते जून २०२४ च्या अखेरीस. भारतीय संघ तब्बल १७ वर्षांनंतर टी२० मध्ये जगज्जेता बनला होता. तसेच ११ वर्षांनंतर भारतात आयसीसी स्पर्धेची ट्रॉफी आली होती.
भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळताना विजेतेपद जिंकलं होतं.