BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

BCCI Naman Awards 2024-25 List: बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा रविवारी नवी दिल्लीमध्ये पार पडला. या सोहळ्यात आयसीसी स्पर्धा जिंकणाऱ्या सर्व भारतीय संघांचा सन्मान झाला, तर तीन दिग्गजांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
BCCI Awards

BCCI Awards

Sakal

Updated on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) वार्षिक पुरस्कार सोहळा (Naman Awards) नवी दिल्लीत रविवारी (१५ मार्च) मोठ्या उत्साहात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात २०२४-२५ या हंगामात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावर दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आणि संघांचा सन्मान करण्यात आला.

त्यातही गेल्या वर्षभरात भारताच्या विविध संघांनी ४ आयसीसी स्पर्धा जिंकल्या, या संघांचा सत्कार या सोहळ्याचे मुख्य वैशिष्य ठरले. याशिवाय भारताचे दिग्गज खेळाडू राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मितारी राज यांनाही त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com