
कसोटी क्रिकेटला महत्त्व मिळवून देण्यासाठी आयसीसी आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धा खेळवते. दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे नवे पर्व सुरू होते. आत्तापर्यंत दोन पर्व यशस्वी झाले असून तिसर्या पर्वाचा अंतिम सामना होणे बाकी आहे.
टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ या तिसऱ्या पर्वाचा अंतिम सामना जून २०२५मध्ये लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळवला जाणार आहे.