पाकिस्तानच्या लढतीपूर्वी BCCI ने सूर्यकुमार यादवच्या संघाची 'ती' विनंती फेटाळली; बोर्ड म्हणालं, तुम्हाला हवं असेल तर...

Team India rules ahead of India vs Pakistan T20 match: वर्ल्ड कप २०२६ आणि भारत-पाकिस्तान लढतीच्या पार्श्वभूमीवर BCCI ने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची महत्त्वाची विनंती फेटाळली आहे. BCCI ने आपल्या जुन्या आणि कडक धोरणावर ठाम राहत या मागणीला नकार दिला.
BCCI Says No To Family Stay During T20 World Cup

BCCI Says No To Family Stay During T20 World Cup

esakal

Updated on

Why BCCI rejected Team India family stay request: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याचा मार्ग मोकळा झाला.. पाकिस्तान सरकारने यू टर्न घेत संघाला भारताविरुद्ध खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे दोन्ही देशांचे चाहते १५ फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याआधी भारतीय संघ १२ फेब्रुवारीला नामिबियाचा सामना करणार आहे. भारताने अमेरिकेला पराभूत करून स्पर्धेची दणक्यात सुरूवात केली, पण हाती आलेल्या वृत्तानुसार सूर्यकुमार यादवच्या संघाने भारतीय नियामक मंडळाकडे ( BCCI ) एक विनंती केली होती, ती अमान्य केली गेली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत राहण्याची विनंती बीसीसीआयला मान्य नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com