आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जाहीर केला.
शुभमन गिल उपकर्णधार म्हणून संघात परतला, तर अनेक तरुण खेळाडूंना संधी मिळाली.
अजित आगरकरने स्पष्ट केले की हा संघ २०२६ T20 वर्ल्ड कपसाठी अंतिम नाही.
BCCI SILENT ON INDIA VS PAKISTAN FIXTURE IN ASIA CUP 2025 : अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने आज आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा केली. ही घोषणा २०२६ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापनाच्या ब्लूप्रिंटची पहिली झलक आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेत खेळणार आहे आणि शुभमन गिल उप कर्णधारपदी परतला आहे. पण, या स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? हा खरा प्रश्न आहे.