
IPL 2025: इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामाला येत्या चार दिवसात म्हणजेच २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन झाल्याने प्रत्येक संघातच मोठे बदल दिसत आहेत.
अशात आता आणखी मोठी घडामोड घडली आहे. एका संघाचे मालकच बदलले आहेत. हा संघ म्हणजे २०२२ आयपीएल जिंकलेला गुजरात टायटन्स. अहमदाबादची फ्रँचायझी असलेला हा संघ आहे.